Thursday, August 5, 2010
माझी कविता क्र.३)मन.
जीवनातील कटु सत्य पचवावच लागत,
मनातील भावनांना कुंपण घालावच लागत.
मन हे निर्भय असत,क्षितिजापलीकडे उडू पाहत.
त्याला एकदातरी अवकाशात झेपायच असत.
झेपतांना सर्व विश्व व्यापायच असत.
कधीतरी आपण हुन जगायच असत.
पण..त्याच्या ह्या इच्छा केवळ इच्छाच राहतात.
कारण..त्याच्या पायात बंधनांच्या बेड्या असतात.
मन हे निरागस असत,मृगजळामागे धावू पाहत.
कधी अड़त तर कधी पड़त असत.
स्वताच स्वताला सावरतही असत.
आपल नशीब आजमावत असत.
पण..शेवटी त्याला निराशच व्हाव लागत.
कारण..ते दिखाव्यानां भुललेल असत.
-:प्रनील गोसावी.
0 comments:
Post a Comment