Friday, May 7, 2010

माझी कविता क्र.१)पण...मात्र...नाही.


चेहरे खोटे असू शकतात पण डोळे मात्र नाही...
माणुस
खोटा असू शकतो पण मन मात्र नाही...
मार्ग खोटा असू शकतो पण हेतु मात्र नाही...
भाव
खोटा असू शकतो पण देव मात्र नाही...
आस्ता
खोटी असू शकते पण मर्म मात्र नाही...
माय
खोटी असू शकते पण ममता मात्र नाही...
नाती
खोटी असू शकतात पण जिव्हाळा मात्र नाही...
वागणे
खोटे असू शकते पण संस्कृति मात्र नाही...
राग
खोटा असू शकतो पण अनुराग मात्र नाही...
जीभा
खोटी असू शकते पण अंतकरण मात्र नाही...
मित्र
खोटा असू शकतो पण मैत्री मात्र नाही...
प्रेमी
खोटा असू शकतो पण प्रेम मात्र नाही...
समाज
खोटा असू शकतो पण देश मात्र नाही...
सुख
: खोटे असू शकतात पण दुख: मात्र नाही...

-:प्रनील गोसावी.