Wednesday, August 4, 2010

माझी कविता क्र.२)सांग कसे फेडू उपकार तुझे आई?


सांग कसे फेडू उपकार तुझे आई ?
आहे मी सदैव तुझाच ऋणी आई.||ध्रु ||


तूच घेतले दोष सर्व माझे पदरी.

अनंताहून मोठे मन तुझे ;जडले या लेकरावरी.

सोसुनी त्रास नवमासांचा;वाढवले तुज उदारी.
नाळीशी हे नाते तुझे-माझे;जपलेस जन्मभरी.||१||


करुनीया कष्ट केलेस उभे;मज पायांवर मजला.

पाउले इविलेसे अढखळताना माझे; दिला स्वास नवेला.

काटा रुतता पायात माझ्या;अश्रु ग तुझ्या डोळ्यात कशाला?

ठेस जर लागली मजला;मग द्रावकता तुझ्या हृदयात कशाला?||२||


खर्च केले मजसाठी तू;आयुष्य तुझे सम्पूर्ण.

उपाशी तू असुनही का ठेवलेस मुखाशी माझ्या;पकवान्न पर्न?
ईश्वराची ही देणगी मजला;लाभली तुजरुपाने सुवर्ण.
सुकनार नाही वृक्ष हा कधीही ;तुज मायेचा तो जीर्ण.||३||


-:प्रनील गोसावी.

0 comments:

Post a Comment