Wednesday, December 29, 2010

माझी कविता क्र.४)जीवन

जगता जगता हसत राहावे ,
अपुले दुख:आपणच सोसवे.

हे जग जरी असेल कठोर,
दुखांचा अफाट डोंगर,
दृष्टांचा अथांग सागर,
अन्यायाचा अक्षय भोवर,
अनितिचा अक्षम्य काहोर,
तरीही तयाला नमन करावे.
जगाता जगाता ...

माणुस जरी असेल दृष्ट,
नाती जरी असेल रुष्ट,
धन जरी असेल श्रेष्ट,
प्रेम जरी झाले नष्ट,
तरीही तयांना प्रेम अर्पावे.
जगता जगाता...

विचार जरी असतील भिन्न,
मने जरी असतील छिन्न,
भूक जरी असेल नगन्य,
द्वेष जरी असेल अनन्य.
तरीही विचार जूळवत रहावे.
जगाता जगाता...

-:प्रनील गोसावी.

0 comments:

Post a Comment