skip to main |
skip to sidebar
जीवनातील कटु सत्य पचवावच लागत,मनातील भावनांना कुंपण घालावच लागत.मन हे निर्भय असत,क्षितिजापलीकडे उडू पाहत.त्याला एकदातरी अवकाशात झेपायच असत.झेपतांना सर्व विश्व व्यापायच असत.कधीतरी आपण हुन जगायच असत. पण..त्याच्या ह्या इच्छा केवळ इच्छाच राहतात.कारण..त्याच्या पायात बंधनांच्या बेड्या असतात. मन हे निरागस असत,मृगजळामागे धावू पाहत.कधी अड़त तर कधी पड़त असत.स्वताच स्वताला सावरतही असत.आपल नशीब आजमावत असत.पण..शेवटी त्याला निराशच व्हाव लागत.कारण..ते दिखाव्यानां भुललेल असत. -:प्रनील गोसावी.
सांग कसे फेडू उपकार तुझे आई ?
आहे मी सदैव तुझाच ऋणी आई.||ध्रु ||
तूच घेतले दोष सर्व माझे पदरी.
अनंताहून मोठे मन तुझे ;जडले या लेकरावरी.
सोसुनी त्रास नवमासांचा;वाढवले तुज उदारी.
नाळीशी हे नाते तुझे-माझे;जपलेस जन्मभरी.||१||
करुनीया कष्ट केलेस उभे;मज पायांवर मजला.
पाउले इविलेसे अढखळताना माझे; दिला स्वास नवेला.
काटा रुतता पायात माझ्या;अश्रु ग तुझ्या डोळ्यात कशाला?
ठेस जर लागली मजला;मग द्रावकता तुझ्या हृदयात कशाला?||२||
खर्च केले मजसाठी तू;आयुष्य तुझे सम्पूर्ण.
उपाशी तू असुनही का ठेवलेस मुखाशी माझ्या;पकवान्न पर्न?
ईश्वराची ही देणगी मजला;लाभली तुजरुपाने सुवर्ण.
सुकनार नाही वृक्ष हा कधीही ;तुज मायेचा तो जीर्ण.||३||
-:प्रनील गोसावी.